अनिल कांबळे
नागपूर,
Instagram friend raped nurse एका 23 वर्षीय महिला नर्सवर अमरावती येथील आराेपी सैफ सय्यद साबिर सय्यद (22) याची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी तहसील पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नर्स आणि सैफ हे दाेघेही इंस्टाग्रामवर ओळखीनंतर मित्र बनले. सैफ त्या महिलेला भेटायला नागपूरला येऊ लागला. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टाेबर 2023 मध्ये ते ताजाबादला गेले.
तिथून ते माेमिनपुरा येथील एका हाॅटेलमध्ये गेले. तिथे सैफने त्या महिलेसाेबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवले. ताे नागपूरला येऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचा आणि तिथे संबंध प्रस्थापित करायचा. Instagram friend raped nurse त्याने तिच्याकडून पैसे उसने घेऊन तिची पिळवणूकही केली. त्याने तिचा माेबाईल फोन घेतला आणि तिचे ाेटाे व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तिच्याशी लग्न करण्यासही नकार दिला. त्या महिलेने तहसील पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.