जम्मू-काश्मीरमध्ये 'ब्लॅकआऊट'ची तयारी?

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
श्रीनगर/नवी दिल्ली:
Jammu and Kashmir: 'Blackout' जम्मू-कश्मीरच्या वातावरणात पुन्हा एकदा शांतता पसरू लागली आहे. पण यावेळी ही शांतता कोणत्याही अनिष्ट घटनेची नसून मोठ्या तयारीची चाहूल आहे. पहलगाम हल्ल्याच्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासित प्रदेशात सरकारने अचानक ब्लॅकआउट आणि एअर रेडसारख्या धोकादायक परिस्थितींना तोंड देण्यासाठी मॉक ड्रिल घेण्याचे आदेश दिले आहेत. या सरावामुळे खोऱ्यात हालचाल वाढली असून सर्वत्र एकच प्रश्न उपस्थित होत आहे की, खोऱ्यात काही मोठे घडणार आहे का?
 
 
Blackout
 
Jammu and Kashmir: 'Blackout'  ज्या पद्धतीने सिव्हिल डिफेन्स स्वयंसेवक, होमगार्ड्स आणि आपत्कालीन यंत्रणांना युद्धपातळीवर सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावरून प्रशासनाला एखाद्या मोठ्या सुरक्षा आव्हानाची शक्यता वाटत असल्याचे दिसून येते. आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांची चेतावणी आणि अचानक लागू होणारा ब्लॅकआउट यांसारख्या परिस्थितींचा सराव अशा वेळी केला जात आहे, जेव्हा भूतकाळातील जखमा अजूनही ताज्या आहेत. हा केवळ नियमित सराव आहे की सीमापारच्या एखाद्या मोठ्या कटाला हाणून पाडण्यासाठी आखलेली रणनीती, याबाबत चर्चा सुरू आहे.