२६ एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
वैद्यकीय महाविद्यालयात पाच मतदान केंद्र
मतदार यादी प्रसिद्ध

यवतमाळ, 
Maharashtra Medical Council Election महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक २०२६ येत्या २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील २०४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे पाच मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान क‘मांक १ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक १ येथे मतदार क्रमांक १ ते ४००, मतदान केंद्र क्रमांक २ डेमॉन्स्ट्रेशन हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक ४०१ ते ८००, मतदान केंद्र क‘मांक ३ लायब‘री येथे मतदार क‘मांक ८०१ ते १२००, मतदान केंद्र क‘मांक ४ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक १ येथे मतदार क‘मांक ते १६००, तर मतदान केंद्र क्रमांक ५ एफएमटी म्युझियम हॉल क्रमांक २ येथे मतदार क्रमांक १६०१ ते २०४२ यांची मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
 
Maharashtra Medical Council
 
मतदारांची यादी Maharashtra Medical Council Election  महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदारांनी आपला मतदान केंद्र क्रमांक व इतर तपशील संकेतस्थळावरून तपासून घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने आहे. मतदानासाठी येताना मतदारांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेले छायाचित्रासह ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. योग्य ओळखपत्राशिवाय मतदान करता येणार नसल्याने सर्व मतदारांनी आवश्यक कागदपत्रांसह मतदान केंद्रावर उपस्थित राहावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांनी आवाहन केले आहे.