बराचवेळ होती वाहतूक ठप्प
मारेगाव,
Maregaon Nagar Panchayat अतिक्रमणधारकांना शासनाच्या आदेशांनुसार कायमस्वरूपी पट्टा मिळावा यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मारेगाव भाजपाच्या वतीने २२ एप्रिल रोजी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात भव्य मोर्चा व रस्ता रोको करण्यात आले. बुधवार, २२ एप्रिलला दुपारी मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी मार्डी चौकात यवतमाळ-वणी मार्गावर पोलिस ठाण्यासमोर भर उन्हात ‘रस्ता रोको’ केला. दुपारी दोनच्या सुमारास एक तास रस्ता रोको सुरू होता. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या लांब रांगा लागल्या.
Maregaon Nagar Panchayat अतिक्रमणधारकांना शासनादेशांनुसार कायमस्वरूपी पट्टा मिळावा, अनधिकृत लेआऊट अधिकृत करून तेथील नागरिकांच्या जागा करून द्यावी, बांधकाम कामगारांच्या फाईलवर नगरपंचायत प्रशासनाने सही करावी, मारेगाव नगरपंचायत हद्दीतील निकृष्ट दर्जाच्या सिमेंट काँक‘ीट रस्त्यांची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी, याकरिता भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व अतिक‘मणधारकांनी आंदोलन केले.
तोडगा व आश्वासन
माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, सरचिटणीस प्रशांत नांदे तहसीलदार उत्तम निलावाड, नगरपंचायतचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन गाडे, पोलिस निरीक्षक श्याम वानखडे यांच्यामध्ये चर्चा झाली. यामध्ये बांधकाम कामगारांच्या फाईलवर सही करण्याचे तसेच अतिक‘मण धारकांना शासनादेशानुसार पट्टा मिळण्याबाबत २७ एप्रिलला बैठक घेऊन निकाली काढण्याचे लेखी आश्वासन नगर पंचायत प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.