२ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
वर्धा,
Mephedrone drug sales मेफेड्रॉन अंमली पदार्थाची विक्री करणार्या दोघांना अटक करून त्यांच्याकडून ३ ग्रॅम ६३ मिलीग्रॅम अंमली पदार्थ, दुचाकी, ४ मोबाईल असा २ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हनुमाननगर बोरगाव (मेघे) येथे करण्यात आली. पोलिसांनी हनुमान नगर, बोरगाव (मेघे) येथील बंद जिनींगमागील भागात छापा टाकला.
(संग्रहित छायाचित्र )
Mephedrone drug sales तिथे कार्तिक वाघमारे (२१), रक्षक देशभ्रतार (२३) दोन्ही रा. हनुमान नगर हे दुचाकीवर मेफेड्रॉनची विक्री करताना मिळून आल्याने मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, विजयसिंग गोमलाडू, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक यांनी केली.