मेट्रोकडून हीट अ‍ॅक्शन प्लॅनची अंमलबजावणी

कामगारांसाठी पाण्याचे रांजण आणि छत्र्यांची व्यवस्था

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
सुमारे १५० ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याचे रांजण
 
 
नागपूर,
heat action plan महा मेट्रो तर्फे हीट अ‍ॅक्शन प्लॅन अंतर्गत निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पांच्या विविध कार्यस्थळांवर कामगारांच्या आरोग्य, सुरक्षितता कार्यक्षमता वाढविण्यासाठी सर्वंकष उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी मेट्रोने नियोजनबद्ध पद्धतीने विविध उपक्रमांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
 
 
heat action plan
 
२०० छत्र्यांची उभारणी
मुख्यत: तीव्र उन्हाळ्याच्या काळात कामगारांना दिलासा मिळावा यासाठी महा मेट्रोकडून सुमारे १५० ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याचे रांजण उपलब्ध करून देण्यात आले २०० छत्र्यांची उभारणी करण्यात आली आहे. heat action plan या उपाययोजनांमुळे कार्यस्थळी काम करणारे कामगार तसेच ट्रॅफिक मार्शल यांना उष्णतेपासून संरक्षण मिळत आहे.

 
सावलीयुक्त व सुरक्षित जागांची व्यवस्था
याशिवाय, कार्यस्थळांवर उष्णतेचा परिणाम कमी करण्यासाठी कामाचे वेळापत्रक उष्ण व तुलनेने थंड कालावधीत विभागून रोटेशन पद्धतीने अनुकूलन केले जात आहे. दिवसातील अत्यंत उष्ण कालावधीत विश्रांती घेता यावी यासाठी सावलीयुक्त व सुरक्षित जागांची व्यवस्था करण्यात आली आहे. heat action plan उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी ओआरएस इतर समतुल्य द्रवांचे नियमित वितरण केले जात असून जड व श्रमसाध्य कामे दिवसातील तुलनेने थंड वेळेत पूर्ण करण्यासाठी कामाचे नियोजन केले जाते.

 
आवश्यक प्रशिक्षण
कामगारांना उष्मा ताणाची लक्षणे ओळखता यावीत तसेच उष्णताजन्य आजारांवर प्रतिसाद देता यावा यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात येत आहे. महा मेट्रोद्वारे राबविण्यात येणार्‍या या उपाययोजनांमुळे कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मोठी मदत होत असून त्यांच्या कार्यक्षमतेत व कामाच्या गुणवत्तेतही सकारात्मक वाढ होत आहे.