मुलीच्या अस्मितेसाठी पिता बनला खुनी
ओयाे हाॅटेल संचालकाचा खून
दिनांक :24-Apr-2026
Total Views |
जरीपटका खून प्रकरणाचा उलगडा
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur News जरीपटका येथील नारा घाटाजवळील नाल्यात सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा करण्यात जरीपटका पाेलिसांना यश आले असून पाेलिसांनी एका आराेपीला अटक केली. आराेपीच्या मुलीबद्दल मृतकाने अपशब्द वापरल्याने संतप्त हाेऊन त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नवीन पंजाबराव पुंडकर (46) दुर्गाजीनगर, नारा गाव असे आराेपीचे नाव आहे. राहुल सुनील शाहू (38) रा. झिंगाबाई टाकळी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

राहुल शाहू हा सदर हद्दीत ओयाे हाॅटेल चालवित हाेता. हाॅटेलसाेबतच ताे व्याजाने पैसे देखील देत हाेता. काही दिवसांपूर्वी आराेपी नवीन पुंडकरने राहुलकडून 50 हजार रुपये व्याजावर घेतले हाेते. राहुलने व्याजासह एक लाख रुपये परत केले, तरी ताे 35 हजार रुपये व्याजाचे बाकी असून पैशासाठी तगादा लावत हाेता. 20 एप्रिल राेजी रात्री 8.30 च्या सुमारास हाॅटेलचा नाेकर आर्यन ढाेपरे यास दाेन तासांत येताे असे सांगितले. त्याचप्रमाणे ‘मी तुला फोन करेल त्यावेळी तू सदर बसथांबा येथे उभा असून मला 35 हजारांची गरज आहे, असे फोनवर सांगशील’ असे सांगून राहुल दुचाकीने निघून गेला. त्याच रात्री राहुलचा लहान भाऊ लक्कीने त्याला अनेक फोन केले मात्र, त्याने फोन उचलला नाही. Nagpur News त्याचा फोन बंद येत हाेता. दुसऱ्या दिवशी सदर पाेलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार करण्यात आली हाेती. दरम्यान, बुधवारी दुपारी एकच्या सुमारास नारा घाटाजवळील नाल्यात राहुलचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी जरीपटका पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून तपासचक्रे फिरविली. त्यानंतर रात्री उशीरा नवीन पुंडकरला पाेलिसांनी ताब्यात घेतले. नवीनने पाेलिसांना सांगितले की, राहुलकडून व्याजाने पैसे घेतले हाेते. पूर्ण पैसे दिले, तरी ताे आणखी पैसे आहेत असे बाेलत हाेता.
मुलीला रात्रभरासाठी पाठव...म्हणताच ‘खेळ खल्लास’
20 तारखेच्या रात्री राहुल हा पैशासाठी नवीनच्या घरी आला हाेता. पैशावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत राहुलने नवीनला ‘तुझ्याकडून पैसे देणे हाेत नाही, तर एक रात्र तुझ्या मुलीला माझ्याकडे पाठव’ असे म्हटले. Nagpur News एकुलत्या आणि लाडक्या मुलीबद्दल असे शब्द ऐकताच नवीनचा पारा चढला. नवीनने लाेखंडी राॅडने राहुलच्या डाेक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह पाेत्यात भरून नारा घाटाच्या नाल्यात फेकून दिला अशीही कबुली नवीनने दिली. पाेलिसांनी त्याची 28 एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडी घेतली आहे. ठाणेदार अनिल ताकसांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कपिल मस्के याप्रकरणाचा तपास करीत आहेत.