अनुदानात वंचित लाभार्थ्यांना तात्काळ मदत वितरित करा
लोकसेवकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा
मानोरा,
तालुक्यातीले भुली येथे सन २३ मध्ये Natural disaster damage नैसर्गिक आपत्तीग्रस्त नुकसान झालेल्या बाधीत वंचित नागरिकांना अनुदानित लाभ तात्काळ वितरीत करा, तसेच अनुदानापासून वंचित ठेवणार्या दोषी लोकसेवकावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, या मागणीसाठी आज, २४ एप्रिल रोजी भुली गावातील आंदोलक पाण्याच्या टाकीवर आत्मदहन करण्यासाठी चढले. वृत्त लिहिस्तोवर आत्मदहन आंदोलन सुरूच होते.
Natural disaster damage जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांना दिलेल्या निवेदनात अजय पुसंडे, राजेश राठोड, मिथून चव्हाण व देवानंद शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे की, सन २३ मधील नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात राजकीय द्वेषापोटी डावलणार्या ग्राम समितीवर चौकशी अहवालानुसार निधी वाटपात अनियमितता करण्यात आली आहे. त्यामुळे दोषीविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा अंतर्गत कार्यवाही करावी. जवळपास चार वर्षाचा कालावधी उलटला तरीसुद्धा तांत्रिक अडचण सुटून दोषी दिरंगाई करणार्या जबाबदार कर्मचार्यावर कार्यवाही होवून वंचित नागरिकांना नैसर्गिक आपत्तीचा लाभ मिळाला नाही. प्रशासकीय विभागीय महसूल दक्षता समितीमार्फत चौकशी सुरू करावी व नैसर्गिक आपत्ती पासून वंचित लाभार्थी नागरिकांना अनुदान वितरीत करण्यात यावे, या मागणीसाठी भुली येथील चार आत्मदहन आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढून बसले आहेत. आंदोलन करताना पाहण्यासाठी गावातील नागरिकांची एकच गर्दी जमलेली होती. आत्मदहन आंदोलन घटनास्थळी तहसीलदार बैठकीसाठी बाहेर गेल्याने इतर अधिकारी व कर्मचारी ठाण मांडून थांबले असून, आंदोलन कर्त्यांना आत्मदहन आंदोलनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर आंदोलन सुरूच होते.