वर्धा,
Pankaj Bhoyar शहरा नजिक असलेल्या पिपरी मेघे येथील टेकडीच्या पायथ्यापाशी असलेल्या इको पार्कसाठी १५ कोटी ३९ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
शहराचा झपाट्याने विस्तार झाला असून शहरासोबतच आसपासच्या १४ गावांमध्ये शहरीकरण वाढले आहे. मात्र, नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी दर्जेदार उद्यानांची कमतरता जाणवत होती. ही गरज ओळखून ना. डॉ. भोयर यांनी पुढाकार घेत पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला. खुल्या जागांमध्ये उद्यानांची निर्मितीवर त्यांनी भर दिला होता. यासोबतच सालोड येथे सुमारे ३० कोटी रुपयांच्या निधीतून इको पार्क मंजूर करण्यात आले होते. पिपरी मेघे येथील श्रीकृष्णदास जाजू कॉलेजच्या लगत आणखी एका इको पार्कची निर्मिती सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने करण्यात आली होती. मात्र इको पार्क मधील सुविधा व सौंदर्य वाढविण्यासाठी निधीची गरज असल्याने पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुढाकार घेत तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देत शासनाकडे पाठपुरावा केला होता. पिपरी मेघे येथील इको पार्कमध्ये नव्याने काही सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. पर्यावरणपूरक संकल्पनांना प्राधान्य दिल्या जाणार आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि जैवविविधतेबद्दल माहिती मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. बांबू व लाकडापासून तयार केलेले टेंट, स्थानिक नैसर्गिक घटकांचा वापर, तसेच निसर्गाशी सुसंगत रचना ही या पार्कची वैशिष्ट्ये असतील.
या प्रकल्पासाठी निधी Pankaj Bhoyar मंजूर केल्याबद्दल डॉ. पंकज भोयर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार व्यत केले. तसेच बोर टायगर रिझर्वच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी वर्धा येथे बैठक आयोजित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दोन इको पार्कमुळे शहराला हरित आणि आकर्षक ओळख मिळणार आहे.