एकाला पोलिस व तिघांना न्यायालयीन कोठडी

परतवाडा फाईल्स

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अमरावती,
Amravati crime परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. सदर घटनेतील अन्य चार आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील एकाला पोलिस तर तिघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 

Paratwada sexual exploitation case, Amravati crime news, 
सदर प्रकरणातील पहिल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत २१ एप्रिलला न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत वाढ करून दिली. दुसर्‍या चार आरोपींना गुरूवारी हजर करण्यात आले होते. त्यातील अहफाज खान मन्सूर खान याच्या पोलिस कोठडीत २७ एप्रिलपर्यंत वाढ झाली आहे. पोलिसांनी अहफाज यांच्याकडील आणखी काही आवश्यक माहिती मिळवायची असल्याचे सांगून पोलिस कोठडी वाढवून मागितली. न्यायालाने ती मान्य केली. या प्रकरणातील आरोपी मानव दिपक सुगंधे, मो. इम्रान मो. साबिर, शेख नावेद शेख हसन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची कारागृहात रवानगी होणार आहे.
विशेष तपास पथक सदर Amravati crime  प्रकरणाचा अतिश गोपनीय पद्धतीने तपास करीत आहे. जप्त मोबाईलमधून प्राप्त झालेल्या माहितीचे विश्लेषण सुरू आहे. तक्रारीसाठी पीडितांना पुढे आणण्याचे प्रयत्न पोलिस करीत आहे.