कोलकाता,
pm-modi : नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कोलकाता येथील सभेत मोठा राजकीय संदेश दिला. त्यांनी आर.जी. कर प्रकरणातील पीडित तरुणीच्या आईसोबत मंच शेअर करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
सभेदरम्यान मोदी यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केला. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर महिलांच्या सुरक्षेबाबत निष्काळजीपणाचा आरोप केला.
या वेळी पीडितेच्या आईची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. या घटनेचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, अशा घटना राज्यातील परिस्थितीचे वास्तव दाखवतात आणि महिलांच्या सन्मानासाठी लढा देण्याची गरज अधोरेखित करतात.
निवडणूक प्रचारात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता वाढली आहे.