अनिल कांबळे
नागपूर,
Police conduct surgical strike शहरातील अवैध दारुविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नागपूर पाेलिसांनी राबविलेल्या विशेष माेहिमेत माेठे यश मिळाले आहे. 20 एप्रिलपासून सुरू झालेल्या या धडक कारवाईत शहरभर एकाच वेळी छापे टाकत पाेलिसांनी 94 गुन्हे नाेंदवले असून 98 आराेपींना जेरबंद केले आहे.
प्र.पाेलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशानुसार, ही व्यापक माेहीम राबविण्यात आली. शहरातील सर्व पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत समन्वयाने कारवाई करत महाराष्ट्र दारूबंदी कायदा आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. Police conduct surgical strike या कारवाईत तब्बल 56 लाख 85 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ क्रमांक 4 अंतर्गत राबविण्यात आलेल्या शाेध माेहिमेदरम्यान शहरातील ढाबे, उपाहारगृहे, निवासगृहे आणि संशयित ठिकाणांवर अचानक धाडी टाकण्यात आल्या.
पाेलिस उपायुक्त रश्मिता राव यांच्या नेतृत्वाखाली 21 एप्रिलच्या रात्री उशिरापासून पहाटेपर्यंत ही कारवाई सुरू हाेती. यामध्ये 30 अधिकारी, 100 पाेलिस अंमलदार आणि एक राखीव पाेलिस पथक सहभागी झाले हाेते. तपासणीत अनेक ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री, वेळेचे उल्लंघन तसेच गुप्त साठा आढळून आला. शहराबाहेरील ढाब्यांमध्ये सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर पाेलिसांनी माेठा आघात करत 12 ठिकाणी कारवाई केली. अंमली पदार्थांशी संबंधित दाेन गुन्हेही नाेंदविण्यात आले. याशिवाय, पाेलिसांनी सराईत गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी पाहिजे आराेपी, फरार गुन्हेगार तसेच नाेंद असलेल्या गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी केली. Police conduct surgical strike एकूण 72 गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणाèयांविरुद्ध 64 प्रकरणे नाेंदवून 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नागपूर पाेलिसांची ही माेहीम केवळ तात्पुरती नसून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
56 लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
नागपूर पाेलिसांच्या विशेष माेहिमेत अवैध दारुविक्रीचे माेठे जाळे उघडकीस आले. एकूण 94 गुन्हे नाेंदवून 98 आराेपींना अटक करण्यात आली. Police conduct surgical strike 56 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ 4 मध्ये 20 प्रकरणे समाेर आली. 12 ठिकाणी कारवाई करण्यात आली, तर अंमली पदार्थांशी संबंधित 2 गुन्हे नाेंदविण्यात आले. 72 गुन्हेगारांची तपासणी, 64 अश्लील वर्तन प्रकरणे आणि 21 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. शहरात काेणतेही अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही, अशी माहिती प्रभारी पाेलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.