राज्यसभेत मोठा राजकीय भूकंप; ‘आप’चे 7 खासदार भाजपामध्ये, नंबर गेम बदलला!

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
raghav-chadha-joins-bjp : देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत आम आदमी पक्षाला (AAP) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभेतील 10 पैकी 7 खासदार भाजपमध्ये सामील झाल्याने संसदेतल्या ‘नंबर गेम’वर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
 
RAGHAV
 
 
या घडामोडीत राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून त्यांनीच या निर्णयाची घोषणा केली. त्यांच्या सोबत इतर सहा खासदारांनीही पक्षाला रामराम करत भाजपचा मार्ग स्वीकारला.
 
घडामोडींचं विशेष म्हणजे, हे सात खासदार एकत्रितपणे भाजपमध्ये गेल्यामुळे संविधानातील ‘दोन-तृतीयांश’ नियम लागू होऊ शकतो. त्यामुळे ही ‘फूट’ न मानता ‘विलिनीकरण’ म्हणून गणली जाऊ शकते, आणि या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता कमी आहे.
 
या मोठ्या राजकीय बदलामुळे राज्यसभेत भाजपची ताकद वाढण्याची शक्यता आहे, तर ‘आप’ची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे, या घडामोडीनंतर ‘आप’कडे राज्यसभेत फक्त तीन खासदार उरल्याचंही समोर आलं आहे.
 
दरम्यान, या निर्णयामुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात याचे मोठे परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.