वर्धा,
Rajesh Bakane देवळी—मतदार संघातील ग्रामीण धार्मिक स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी आ. राजेश बकाने यांनी पुढाकार घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
देवळी तालुयातील प्राचीन व ऐतिहासिक कोटेश्वर देवस्थान , हिंगणघाट तालुयातील राजेश्वर देवस्थान (पोटी) तसेच साती येथील जनकेश्वर देवस्थान यांच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तीर्थक्षेत्रांचा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत समावेश करून त्यांच्या पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा, अशी विनंती आ. बकाने यांनी केली.
मंदिर परिसराचे सुशोभीकरण, भाविकांसाठी निवास व स्वच्छतागृह सुविधा, रस्ते व दळणवळण सुधारणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग सुविधा तसेच परिसराचे सौंदर्यीकरण अशा विविध कामांचा प्रस्ताव देण्यात आला. या विकासकामांमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होईल आणि ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यत केला.
ना. गोरे यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत संबंधित विभागांना प्रस्तावांचा आढावा घेऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.आ. बकाने म्हणाले की, ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांचा विकास हा केवळ श्रद्धेचा विषय नसून तो स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देणारा, सांस्कृतिक वारसा जपणारा आणि पर्यटनाच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे या स्थळांचा नियोजनबद्ध व शाश्वत विकास होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या पुढाकारामुळे देवळी—हिंगणघाट परिसरातील धार्मिक स्थळांना नवसंजीवनी मिळणार असून भविष्यात ही तीर्थक्षेत्रे राज्याच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे स्थान मिळवतील, असा विश्वास व्यतहोत आहे.