निवृत्त पाेलिस अधिकाऱ्यांचा महिलेवर बलात्कार

24 तासांत दाेन बलात्काराचे गुन्हे दाखल

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर, 
police officer rapes woman एका निवृत्त पाेलिस अधिकाऱ्याने एका विधवा महिलेकडून पैसे उकळून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे पाेलिस विभागाची प्रतिमा मलीन झाली आहे. शहरात 24 तासांच्या आत बलात्काराच्या दाेन घटना घडल्या. एक घटना पाचपवलीत, तर दुसरी तहसील पाेलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. आराेपी हा हुडकेश्वरच्या पिपळा फाटा येथील रहिवासी निवृत्त पाेलिस अधिकारी सुरेश विश्वनाथ शेजाेल (57) आहे. शेजाेलने वर्षभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेतली हाेती. पीडित महिला, एक 50 वर्षीय महिला, हिने आपला पती गमावला आहे. त्यांना दाेन मुले असून, त्यापैकी एक विदेशात राहताे.

police officer rapes woman
 
तिची शेजाेलेशी 2011 मध्ये भेट झाली. मुलाच्या परदेशातील वास्तव्यामुळे आणि तिच्या एकाकी जीवनामुळे ती निराश झाली हाेती. हीच संधी साधून पाेलिस असलेल्या सुरेशने तिला लग्नाचे आमिष दाखवले. याच्याच नावाखाली त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. त्याने वेगवेगळ्या बहाण्यांनी तिच्याकडून पैसे उकळण्यासही सुरुवात केली. जेव्हा त्या महिलेने लग्नाबद्दल विचारले, तेव्हा ताे तिचा प्रस्ताव टाळू लागला. police officer rapes woman याच काळात, त्या महिलेच्या लक्षात आले की, रमेशनेे इतर महिलांचीही फसवणूक केली हाेती. जेव्हा तिने त्याला जाब विचारला, तेव्हा रमेसने तिला मारहाण करण्यास आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने तिच्या कुटुंबीयांना दाेघांचे शारीरिक संबंधाचे आक्षेपार्ह फोटोही पाठवले. यानंतर, त्या महिलेने पाचपवली पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. रमेशने वर्दीचा धाक दाखवून अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे. सखाेल तपासानंतरच सत्य समाेर येऊ शकते.