रेल्वेच्या ३३ केव्ही विद्युत तारेचा जबर धक्का; दोन भाऊ गंभीर जखमी

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट, 
Shock from a railway power line स्थानिक शाास्त्री वॉर्ड परिसरात रेल्वे लाईनजवळ राहणार्‍या अथर्व (१०) व नक्ष उर्फ जीवन श्याम कातरे (१३) या दोन भावांना रेल्वेच्या ३३ केव्ही विद्युत तारेचा धक्का बसल्याने ते गंभीररीत्या भाजले. ही घटना गुरुवारी घडली.
 
 
 power line
 
Shock from a railway power line  मिळालेल्या माहितीनुसार, अथर्व व नक्ष उर्फ जीवन हे दोन्ही भाऊ आई-वडिलांसोबत रेल्वे लाईननजीकच्या झोपडपट्टीत राहत होते. घरातील पाळीव कबुतरे रेल्वे लाईनवरील उच्चदाब तारेवर बसलेली पाहून त्यांनी लोखंडी सळाखीच्या मदतीने कबुतरं उडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सळाखीचा स्पर्श ३३ केव्ही विद्युत तारांना झाल्याने अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नितेश नवरखेडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी मुलांना दवाखान्यात दाखल केले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्राम येथे हलविण्यात आले.