वर्धा,
Shreya Deshmukh भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हा महिला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस, वर्धा नपच्या माजी शिक्षण सभापती श्रेया देशमुख यांची जिल्ह्यातील अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागच्या अंतर्गत कार्यरत असणार्या जिल्हा दक्षता समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांची ही निवड पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केली. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री पंकज भोयर तर उपाध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. श्रेया देशमुख जिल्ह्यातील अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर असुन महिलांसाठी त्या धाऊन जातात. नियुतीबद्दल त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे आभार मानले. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन द्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थे मार्फत वितरित करण्यात येणार्या वस्तूंवर देखरेख ठेवण्याचे काम करते.