राष्ट्रीय स्पर्धेत
अॅड. नारायण तांबुळे यांनी पार केले १० किमी
यवतमाळ,
Swimming competition केरळ राज्यातील अलुवा येथे पेरियार नदीत पार पडलेल्या लांब पल्ल्याच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत ६७ वर्षीय अॅड. नारायण तांबुळे यांच्यासह हौशी जलतरणपटूंनी अतिशय चमकदार कामगिरी केली. प्रवाहासोबत तसेच प्रवाहाविरुद्ध दिशेने पोहण्याच्या स्पर्धेत अॅड. नारायण (राम) तांबुळे १० किमी, बबन बांबोर्डे ६ किमी, शैलेश देशमुख, श्रीकांत आसेकर, अभियंता सुरेश भुसंगे, विष्णू गायकवाड, वसंत राठोड, विलास पाटील यांनी ४ किमी आणि हेमंत राजुरकर १ किमी लांबीच्या स्पर्धेत सहभागी झाले होते. सर्व नियोजित अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले.
Swimming competition अॅड. नारायण तांबुळे यांनी १० किमी अंतर ५ तास ३६ मिनिटांत पूर्ण करून त्यांच्या वयोगटात चौथा क‘मांक पटकवला. या स्पर्धेत देशभरातून ९०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. तांबुळे यांनी यापूर्वीही बर्याच वेळा लांब पल्ल्याच्या स्पर्धांमध्ये अशीच उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ५६ वर्षीय बांबोर्डे यांनी ६ किमी अंतर २ तास ५७ मिनिटांत पूर्ण करून त्यांच्या गटात चौथा क‘मांक पटकावला. जबर अपघातामुळे मांडीचा सांधा बदललेल्या शैलेश देशमुख यांनी या स्पर्धेत ४ किमी अंतर निर्धारित वेळेत पूर्ण केले. येथील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ. अजित फडके यांनी शैलेश देशमुख यांचे विशेष कौतुक केले आहे.