विरोधकांनी महिलांचा अधिकार हिरावून घेतला

केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांचा आरोप

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
नागपूर,
Union Minister CR Patil आगामी लोकसभा निवडणुकांसाठी लोकसभेच्या जागा वाढवून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न काँग्रेससह इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी धुसर केले आहे. विरोधी पक्षांच्या महिलांचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांनी पत्रपरिषदेत केला. यावेळी खासदार दर्शना सिंग, खा.माया इवनाते, माजी खा.अजय संचेती, आ.कृष्णा खोपडे, प्रगती पाटील, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
 
 
CR Patil
 
काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षाने नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी आवश्यक असलेले संविधान दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ दिले महिलांच्या हक्काचे विधेयक पाडून विरोधकांनी जल्लोष साजरा करणे हे अत्यंत निंदनीय आहे. Union Minister CR Patil नारी शक्तीचा हा अपमान आगामी निवडणुकीत विरोधकांना भोगावा लागणार आहे.
 
महिलांना सन्मान देण्याची संधी गमावली
लोकसभेत झालेल्या मतदानादरम्यान संविधान (१३१ वे) दुरुस्ती विधेयक २०२६’ आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताअभावी मंजूर झाले नाही. या मुख्य विधेयकासोबतच सरकारने परिसीमन विधेयक, आणि संघ राज्य विधी (संशोधन) विधेयक, २०२६ देखील चर्चेसाठी ठेवले होते. Union Minister CR Patil विरोधकांनी महिलांना सन्मान देण्याची मोठी संधी गमावली आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना आता ३३टक्के आरक्षण मिळू शकणार नाही, जो त्यांचा हक्क होता. महिलांना दिशाभूल करण्याचे कार्य काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून सातत्याने केल्या जात असल्याचा आरोप खासदार दर्शना सिंग केला.