कोलकाता,
biplab-dasgupta-passes-away : बंगाली चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे निधन झाले आहे. ते 75 वर्षांचे होते. दीर्घ आजारानंतर त्यांनी कोलकाता येथे अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना आरोग्याच्या तक्रारी होत्या. प्रकृती अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात येत असताना त्यांचे निधन झाले.
बिप्लब दासगुप्ता यांनी बंगाली चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात मोठे योगदान दिले. ‘बाईशे श्राबण’, ‘गुमनामी’ आणि ‘झुल्फिकार’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
याशिवाय त्यांनी 17 हून अधिक मालिकांमध्ये काम केले असून ‘केमिस्ट्री माशी’, ‘जोगोमाया’, ‘चेकमेट’ यांसारख्या मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.