वीज वितरण प्रशासनाला निवेदन
वाशीम,
Washim: Electricity Distribution Company तालुक्यातील गोंडेगाव येथील श्री गजानन महाराज मंदीरासमोरील विद्युत खांब पुर्णपणे वाकला असून, त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर खांब काढून त्याठिकाणी नविन खांब बसविण्याची मागणी गोवर्धन चौधरी यांनी वीज वितरण कंपनीकडे निवेदनातून केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, मी श्री संत गजानन महाराज मंदीरासमोर राहतो.
Washim: Electricity Distribution Company माझ्या घरासमोरील विद्युत खांब हा पुर्णपणे वाकला असून तो निर्जीव झाला आहे. सुसाट्याचा वारा असल्यास तो खांब उन्मळून किंवा मोडून पडण्याची शक्यता आहे. सदर विद्युत खांबावरुन जीवंत विद्युत प्रवाह सुरू आहे. त्यामुळे मोठी दुघटना होवून जिवीतहानी होऊ शकते. तो खांब बदलून त्याठिकाणी नविन खांब बसविण्याची मागणी गोवर्धन चव्हाण यांनी निवेदनातून केली आहे.