पीक अप-मोटारसायकल अपघातात तीन ठार

लांभाडे दाम्पत्यासह १२ वर्षीय मुलगा ठार

    दिनांक :24-Apr-2026
Total Views |
वाशीम,
Washim road accident भरधाव वेगाने येणार्‍या पीकअप वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने मोटारसायकलवरील तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान वाशीम- मंगरुळनाथ रोडवरील पार्डी टकमोर फाट्यावर घडली. या अपघाताची तिव्रता येवढी मोठी होती की, मोटारसायकलचा जागीच चुराडा झाला.
 

Washim road accident, pickup van collision motorcycle India, 
प्राप्त माहितीनुसार वाशीम तालुयातील वारा जहागीर येथील रहिवासी संतोष लांभाडे (वय ४०) पत्नी कलावतीबाई लांभाडे (वय ३५) व मुलगा ईश्वर लांभाडे (वय १२) वर्षे हे वारा येथून पार्डी टकमोर येथे नातेवाईकाकडे आले होते. वारा येथे परत जाताना पार्डी टकमोर फाट्यावर चौफुलीवरून समोर जात असताना मंगरुळनाथकडून येणारे पीकअप हे वाहन मोटार सायकल चालवत असलेल्या संतोष लांभाडे यांना दिसले नाही. परिणामी मोटारसायकलला पीकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात संतोष लांभाडे, पत्नी कलावती लांभाडे व मुलगा ईश्वर लांभाडे हे पती - पत्नी व मुलगा जागीच ठार झाले. धडक देणार्‍या पीकअप वाहनाच्या चालकाने वाहन सुसाट वेगाने वाशीमकडे नेले.
अपघाताच्या आवाजाने पार्डी टकमोर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, या अपघातात तिघेही मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती वारा जहागीर येथे होताच गावात एकच शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.