‘त्यांनी’ बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार गमावला

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
श्याम मानव यांची भूषण गवई यांच्यावर टिका
 
अमरावती, 
जादूटोणा विरोधी कायद्याचे उल्लंघन करणार्‍या धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीला माजी सरन्यायाधीश भूषण गवई जात असेल, तर त्यांना आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही, असे परखड मत अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक  Shyam Manav प्रा. श्याम मानव यांनी व्यक्त केले.
 
 
syam
 
Shyam Manav  अंनिसची बुवाबाजी विरोधी प्रबोधन सभा शनिवारी स्थानिक संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पार पडली. त्यापूर्वी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी भूमिका मांडली. भूषण गवई यांनी नुकतीच सहकुटुंब पं. धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली. त्याबाबतचे त्यांचे छायाचित्रही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहे. दुसरीकडे धीरेंद्र शास्त्री हे त्यांच्या प्रवचनादरम्यान दिव्यदरबार भरवित असल्याने त्यांच्यावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसतर्फे केल्या जात आहे. सरन्यायाशीसारखे सर्वोच्चपद भूषवूनही भूषण गवई धीरेंद्र शास्त्रींपुढे नतमस्तक होत असेल, तर आता भूषण गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा सांगू नये, असे रोखठोक मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल होऊ नये व त्याचा प्रचार व प्रसारही होऊ नये, अशी सध्या महायुती सरकारची भूमिका असल्याचाही आरोप त्यांनी केला. पत्रपरिषदेत अंनिसचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे, डॉ. बबन बेलसरे, शेखर पाटील आदी उपस्थित होते.
 
 
धीरेंद्र शास्त्रींनीा ८० लाखांचे बक्षीस
धीरेंद्र शास्त्री यांना खरच दिव्य दृष्टी असेल, तर त्यांनी अंनिसचे आव्हान स्वीकारले पाहिजे. ते आव्हान जिंकल्यास त्यांना ८० लाखांचे पारितोषिक देण्यात येईल, असे प्रा. श्याम मानव यांनी सांगितले.