162 अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा कठोर निर्णय

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
162 officials transferred दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कर प्रशासनातील भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अनियमितता लक्षात घेऊन ट्रेड अँड टॅक्सेस (जीएसटी) विभागात मोठ्या प्रमाणावर प्रशासनिक फेरबदल केले आहेत. या कारवाईत एकूण 162 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या तीन सहाय्यक आयुक्तांचाही समावेश आहे.
 

162 officials transferred Delhi GST department transfers, 
ही कारवाई 8 एप्रिल रोजी आयटीओ परिसरातील राज्य जीएसटी कार्यालयाच्या अचानक केलेल्या पाहणीदरम्यान समोर आलेल्या गंभीर अनियमिततांनंतर करण्यात आली आहे. या पाहणीत कार्यालयीन कामकाजात पारदर्शकतेचा अभाव आणि काही प्रशासकीय त्रुटी आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बदली झालेल्या 162 officials transferred  अधिकाऱ्यांमध्ये विविध स्तरांवरील कर्मचारी समाविष्ट आहेत. यामध्ये 58 सेक्शन ऑफिसर, 22 सहाय्यक सेक्शन ऑफिसर, 74 वरिष्ठ सहाय्यक, पाच कनिष्ठ सहाय्यक तसेच तीन सहाय्यक आयुक्तांचा समावेश आहे. अनेक अधिकारी दीर्घकाळ एकाच विभागात कार्यरत असल्याने प्रशासकीय कामकाजात स्थैर्य निर्माण होण्याऐवजी अनियमितता वाढल्याचा आरोप करण्यात येत होता.मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या प्रकरणावर कठोर भूमिका घेत प्रशासनात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे ही आपल्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. कोणत्याही स्तरावर भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यांनी पुढे असेही 162 officials transferred  सांगितले की भविष्यातही अशा प्रकारच्या अचानक तपासण्या सातत्याने सुरू राहतील. जनहिताच्या कामकाजात निष्काळजीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.या निर्णयामुळे दिल्लीच्या कर प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून, प्रशासन अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.