मुंबई,
luxury car as a weapon मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणात जप्त करण्यात आलेली बीएमडब्ल्यू कार परत देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या प्रकरणात ही कार केवळ वाहन नसून तिचा वापर धोकादायक साधनासारखा झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल डी. साळुंखे यांनी आदेश देताना सांगितले की, घटनास्थळी पाहता वाहनाचा वापर अशा प्रकारे झाला आहे की तो शस्त्रासारखा मानला जाऊ शकतो. तसेच अशा वाहनाचा पुन्हा गैरवापर होण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ही घटना ७ जुलै २०२४ रोजी घडली होती. वरळी भागात एका बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती जखमी झाले होते. घटनेनंतर आरोपीला काही दिवसांनी अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित कार जप्त केली होती. luxury car as a weapon आरोपीने न्यायालयात अर्ज करून कौटुंबिक आणि कामाच्या गरजेसाठी कार परत मिळावी अशी मागणी केली होती. तसेच तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र दाखल झाले आहे, असा दावा त्याच्या वकिलांनी केला होता.
दुसरीकडे सरकारी पक्षाने या मागणीला जोरदार विरोध केला. कार परत दिल्यास पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याचा धोका असल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. luxury car as a weapon हा प्रकरण साधा अपघात नसून गंभीर गुन्ह्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी न्यायालयात मांडले. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने ठरवले की, या टप्प्यावर जप्त केलेली कार परत देणे योग्य नाही. पुराव्यांचे संरक्षण आणि प्रकरणाच्या गंभीरतेचा विचार करून कार न्यायालयीन ताब्यात ठेवण्याचा निर्णय देण्यात आला आहे.