बाभुळगाव पहूर येथील महिला जागेच्या पट्ट्यापासून वंचित

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
बाभुळगाव, 
तालुक्यातील पहुर येथील रहिवासी महिलेला 15 वर्षांपासून तिच्या हक्काच्या पट्ट्यापासून वंचित ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 60 वर्षीय विधवा महिला रफियाबी शेख फकीर मोहंमद जागेच्या पट्ट्याकरिता सरकारी कार्यालयात जाऊन आपली कहाणी सांगत आहेत. तालुक्यातील Bembala Project बेंबळा प्रकल्पामुळे इतर गावांसह पहूर गावाचे पुनर्वसन दोन ठिकाणी केल्या गेले. अर्धेगाव पहूर गावाजवळ, तर अर्धे गावकरी यवतमाळ-धामणगाव मार्गावरील चांदोरेनगरमागे वास्तव्यास आहेत.
 
 
Bembala Project
 
Bembala Project  या महिलेला जिल्हा पुनर्वसन विभागाकडून 25 एप्रिल 2011 रोजी 2 हजार चौरस फुटांचा प्लॉट देण्यात आला. यावेळी प्रत्यक्ष मोक्यावर हजर विधवा महिलेला ताबा पावतीसुद्धा देण्यात आली. मात्र या प्लॉटचा पट्टा तिला आजपर्यंत देण्यात आला नाही. अशिक्षीत असलेली ही महिला सर्वत्र कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. संबंधित विभागाने या महिलेचा तिच्या हक्काचा पट्टा 15 वर्षांपासून का रोखून धरला, याची चौकशी आवश्यक आहे. पुनर्वसित कुटुंबांना पट्टे दिल्याशिवाय वर्ग दोनचे पट्टे पुढे एक करण्यात आले. मात्र या महिलेला 15 वर्षांपासून का थांबवले, हा कळीचा मुद्दा समोर आला आहे. शासनाकडून आपल्याला मिळालेल्या 2 हजार फूट जागेचा हक्काचा पट्टा मिळावा एवढीच तिची रास्त मागणी आहे. आता संबंधित विभाग यावर काय कार्यवाही करणार, याकडे सर्व गावकèयांचे लक्ष लागले आहे.