- चौथी फेडरेशन कप कनिष्ठ गट राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा
नागपूर,
भारतीय अॅथलेटिक्स महासंघाच्या वतीने आणि कर्नाटक राज्य संघटनेच्या अधिपत्याखाली महात्मा गांधी स्टेडियम, टूमकुर (कर्नाटक) येथे २० वर्षाखालील मुलींच्या आज झालेल्या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी जान्हवीने १५०० मीटर दौडीचे कांस्यपदक प्राप्त केले. तिने ४ मिनिटे ३८.३९ सेकंद अशी वेळ नोंदविली. सुवर्ण पदक मध्यप्रदेशच्या राधा यादव तर रौप्यपदक महाराष्ट्रच्या सांगलीच्या स्नेहल खरात हिने प्राप्त केले.
टुमकुर येथे २४ व्या फेडरेशन कप राष्ट्रीय कनिष्ठ गट अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जान्हवीने यापूर्वी शालेय राष्ट्रीय स्पर्धा, भिवानी (हरयाणा) येथे १५०० मीटर दौडीचे कांस्यपदक प्राप्त केले होते. ती हिंदू मुलींच्या शाळेची विद्यार्थिनी असून अश्फाक शेख हे तिचे प्रशिक्षक आहेत.
दुसरी खेळाडू कशिश भगत ४०० मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र होऊ शकली नाही. मात्र, उपान्त्य फेरीत तिने ५५.९० सेकंद अशा सर्वोत्तम वैयक्तिक वेळेची नोंद केली.
Bronze medal for Janhvi मुलांचे गटात प्रणय उपासे आणि हर्षल जोगे उद्या ८०० मीटर दौडीत तर अभिषेक बावणे ३००० मीटर स्टिपलचेस शर्यतीत सहभागी होत आहेत, अशी माहिती जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी दिली.
जान्हवीच्या कामगिरीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे यांचेसह नागेश सहारे, उमेश नायडू, शेखर सूर्यवंशी, डॉ. संजय चौधरी, रवींद्र टोंग आदींनी अभिनंदन केले आहे.