देवधरीफाटा ते दहेगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करा

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

राळेगाव, 
तालुक्यांतर्गत येणाèया देवधरी फाटा ते दहेगाव रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची त्वरित चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यासंदर्भात दहेगावातील ग्रामस्थांनी गुरुवार, 23 एप्रिलला जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले. CM Gram Sadak Yojana मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या देवधरी फाटा ते दहेगाव या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून आवश्यक तांत्रिक निकष व गुणवत्तेचे पालन होत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
 
 
y25Apr-Devdhari
 
CM Gram Sadak Yojana  निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास शासनाचा निधी वाया जाईल व लवकर रस्ता खराब होऊन हाल सहन करावे लागतील. त्यामुळे या प्रकरणाची तत्काळ स्वतंत्र व निष्पक्ष तांत्रिक चौकशी करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत रस्त्याचे काम त्वरित स्थगित करण्यात यावे. संबंधित ठेकेदार, अभियंता, अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर प्रशासकीय तसेच कायदेशीर कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे निकृष्ट व भ्रष्टाचारयुक्त काम होणार नाही. अन्यथा, ग्रामस्थांना न्याय मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व 7 मे पासून उपोषण सुरु करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला. निवेदन देताना शिवसेना विभागप्रमुख, युवराज चटकी, रामा डाहुले, प्रशांत काकडे, सागर पावडे, सुमीत भुते, कुणाल हरबडे, अक्षय हरबडे, तेजस डाहुले, अनिकेत बदखलसह अनेकजण उपस्थित होते.