अमरावतीत पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
तडीपार ताब्यात, शस्त्र जप्त
 
अमरावती, 
शहर पोलिस आयुक्तालयातर्फे Combing operation कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अनेकांना यावेळी ताब्यात घेण्यात आले व वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली २४ एप्रिलच्या रात्री १० वाजतापासून ते २५ एप्रिलच्या पहाटे २ पर्यंत नाकाबंदी/कोम्बिंग ऑपरेशन राबबिण्यात आले होते. नाकाबंदी मोहीमे दरम्यान ८ पोलिस स्टेशनच्या हद्दी ९ ठिकणी नाकाबंदी करण्यात आली. सदर ऑपरेशनमध्ये प्रमुख अधिकारी सहभागी होते.
 
 
Combing operation
 
Combing operation  ४ तडीपार इसमांवर कार्यवाही करण्यात आली. विक्की उर्फ गणेश मधुकर खडसे, विशाल गंगानाथ तायवाडे, महेन्द्र उर्फ तुफान भगवान चंडकापुरे, मयुर राजेश चाळीसगावकर यांचा त्यात समावेश आहे. ७ जणांवर कारवाई करून ७ घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. अमली पदार्थ सेवन करणार्‍या २ युवकांना ताब्यात घेण्यात आले. १६ इसमांकडून देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली.
 
 
एकूण ५४ हिस्टीशिटर तसेच ४ निगराणी बदमाश तपासण्यात आले. संशयास्पद हालचाली करून दखलपात्र गुन्हा करण्याच्या बेतात असनार्‍या एकूण ८ इसमांवर कार्यवाही करण्यात आली. ९ अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. नाकाबंदीत ३७५ वाहने तपासण्यात आली. ३१ वाहन धारकांवर कार्यवाही करून इतर ३८ वाहन धारकांकडून दंड वसुल करण्यात आला. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये एकूण ५१ अधिकरी व ३०६ अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगीरी केली.