हिंगणघाट,
येथील प्रभाग ९ मधील डांगरी वार्ड पूल ते दोन तोंड्या नळापर्यंत असलेल्या मोठ्या नाल्याची साफ सफाई पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्याकरिता Corporator Sheetal Borkar नगरसेवक शितल बोरकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदना द्वारे मागणी केली होती. या निवेदनाची प्रशासनाने तात्काळ दखल घेत नाल्याची साफ सफाई करण्यात आली.
प्रभाग ९ मधील नाल्याची गेल्या अनेक दिवसापासून साफसफाई झालेली नाही. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि गाळ साचल्यामुळे पाण्याच्या निचरा व्यवस्थित होत नाही. नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली आहेत. नाल्याला लागून शंभर पेक्षा जास्त नागरिकाचे घरे असून नाल्यात साचलेल्या सांडपाण्यामुळे डासाचे प्रमाण वाढले आहेत. नाल्यातील घाणीमुळे परिसर प्रचंड दुर्घधी पसरलेली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने नाल्याची साफ सफाई करण्याची मागणी Corporator Sheetal Borkar नगरसेवक शितल अमोल बोरकर यांनी केली होती.