26 लाखांचा मुद्देमाल जप्त
चंद्रपूर,
Cow smuggler तस्करी करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत तब्बल 26 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शनिवार, 25 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजताच्या दरम्यान चंद्रपूर मार्गे गोवंशाची कत्तलीकरिता तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पडोली रस्त्यावरील राहुल ढाब्यासमोर सापळा रचला असता एक आयशर ट्रक क्रमांक एमएच 34, झेड 1158 ला पोलिसांनी थांबवित झडती घेतली. आयशर ट्रकमध्ये 17 गायी, 13 बैल असे 30 गोवंश अत्यंत निर्दयतेने कोंबून ठेवले होते. गोवंश जनावरांचे हात-पाय आणि तोंड घट्ट दोरीने बांधलेले होते.
Cow smuggler चारा किंवा पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. हे सर्व जनावरे गडचिरोली जिल्ह्यातील कोरची मार्गे तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी नेल्या जात होते. पोलिसांनी यावेळी चालक निमामुद्दीन अमीनुद्दीन (38, रा. मूर्तिजापूर, जि. अकोला) व मोहम्मद इरफान शेख हन्नान (रा. मूर्तिजापूर) यांना अटक करण्यात आली असून, यामधील एक आरोपी मोईन शेख (रा. गडचांदूर) हा पसार झाला आहे. वाहन व गोवंश जनावरे असा एकूण 26 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर रामनगर पोलिस ठाण्यामध्ये विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुटका झालेल्या सर्व जनावरांना प्यार फाउंडेशनमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामवार यांनी केली.