जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक
यवतमाळ,
District Sports Complex Committee जिल्हयात क्रीडा सुविधा निर्मितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेत जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा सभा पार पडली. बैठकीत जिल्हाधिकाèयांनी क्रीडा सुविधा निर्मितीचा आढावा घेतला.
District Sports Complex Committee यात आझाद मैदान येथील जलतरण तलाव दुरुस्ती, फिल्टर प्लांट, सिंथेटिक हँन्डबॉल मैदान, दुकान बांधकाम, अॅस्ट्रो टर्फ हॉकी मैदान या कामांबाबत आढावा घेऊन नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी दर्जेदार कामे झाली पाहिजेत, अशा सूचना जिल्हाधिकाèयांनी दिल्या. या बैठकीला जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देवून प्रस्तावित कामांच्या जागेची पाहणी करून आवश्यक सुधारणात्मक सूचना दिल्या.