जिद्द, चिकाटी आणि कष्टाची कहाणी

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
रजनी धामोरे यांचा ‘रजनीअंबा’ ब्रँड गाजतोय

दारव्हा, 
Entrepreneur Rajni Ambadas Dhamore  रजनी अंबादास धामोरे (माहुली, ता. दारव्हा) यांनी आपल्या मनाचा पक्का निर्धार, जिद्द, चिकाटी व सातत्याच्या जोरावर गृह उद्योग सुरू करून एक यशस्वी स्त्री उद्योजक म्हणून वाटचाल सुरू केली आहे. रजनी धामोरे यांचा कृषी विज्ञान केंद्र, सांगवी येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
 
y25Apr-Rajani
 
मनाचा निर्धार पक्का झाला की अशक्य बाबसुद्धा शक्य होते. हे माहुली येथील Entrepreneur Rajni Ambadas Dhamore उद्योजक रजनी अंबादास धामोरे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या गृहोद्योगाची सुरुवात तीन वर्षांपूर्वी सत्यसाई सेवा समितीच्या पुढाकारातून कृषी विज्ञान केंद्र, सांगवी यांच्या सहकार्याने दारव्ह्यात आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिरातून झाली. त्या शिबिरात प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी वेगळे करण्याची जिद्द ठेवत अनेक अडचणींवर मात केली.
 
 
कृषी विज्ञान केंद्र, सांगवी येथील विषयतज्ञ नम्रता राजस यांच्या मार्गदर्शनात त्यांनी ‘रजनीअंबा’ गृह उद्योग सुरू केला. प्रारंभी अस्सल वèहाडी चवीचे आंबा, लिंबू, हळद व मिरचीचे लोणचे तयार करून अकोला व यवतमाळ येथे प्रदर्शनात मांडले. ग्राहकांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे त्यांना अधिक प्रेरणा मिळत गेली. याप्रसंगी माजी मंत्री तथा नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे, संचालक राहुल ठाकरे, संचालक अतुल ठाकरे, कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ-2 चे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. नंदकिशोर हिरवे यांच्यासह इतर मान्यवर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.