फटाका कारखान्यात स्फोट, दोन कामगारांचा मृत्यू

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
चेन्नई
firecracker factory explosion तमिळनाडूतील थेनी जिल्ह्यातील कंबम शहरात शनिवारी सकाळी एका खासगी फटाका कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला. कात्तुपल्ली वासल स्ट्रीटवरील लक्ष्मी फायरक्रॅकर फॅक्टरीमध्ये ही दुर्घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 

firecracker factory explosion 
मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात अय्यप्पन, नागार्जुन, सूर्या आणि दिनेश उर्फ धीना हे कामगार जखमी झाले होते. मात्र सूर्या आणि दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर अय्यप्पन आणि नागार्जुन हे स्फोटाचा आवाज ऐकून घाबरून बाहेर पळाल्याने बचावले. मृतदेहांची स्थिती अत्यंत विदारक असल्याचे पोलिसांनी सांगितले.कारखाना गेल्या दोन दिवसांपासून निवडणूक सुट्टीमुळे बंद होता. शनिवारी काम पुन्हा सुरू झाल्यानंतर सूर्या आणि दिनेश हे कच्चा माल ठेवलेल्या स्टोअर रूममध्ये गेले. त्यांनी दरवाजा उघडताच अचानक भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण परिसर हादरून गेला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की दोघांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी थेनी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू केला आहे.स्टोअर रूममध्ये स्फोट नेमका कशामुळे झाला, कच्च्या मालाच्या साठवणुकीत सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, तसेच कारखान्यातील सुरक्षाव्यवस्था योग्य होती का, याचा तपास सध्या सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक firecracker factory explosion प्रशासनावर पुन्हा एकदा फटाका कारखान्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लक्षात घेण्यासारखे म्हणजे, याआधी 19 एप्रिल रोजी तमिळनाडूतील विरुधुनगरजवळील एका फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटात तब्बल 25 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे राज्यातील फटाका उद्योगांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.