10 महिन्यांनंतर तीन फरार गुन्हेगारांना अटक

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
बाभुळगाव, 
Fugitive criminals arrested पोलिसठाणे हद्दीत घडलेल्या विविध गुन्ह्यांत फरार आठ आरोपींमधील तीन फरार गुन्हेगारांना अटक केली. ही कारवाई बाभुळगाव पोलिसांनी मंगळवार, 21 एप्रिलला संध्याकाळी केली. मागील 10 महिन्यांपासून फरार असलेले आरोपी शेख सोहेल शेख रऊफ (वय 24), शेख अन्वर रसूल (वय 45) (दोघेही रा. बाभुळगाव) व अहसान मिया उर्फ सफत मिया देशमुख (वय 21, राणीअमरावती) असे तिन आरोपी लपून असलेल्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली होती.
 
 
arest
 
Fugitive criminals arrested  त्यावरून पोलिसांनी सापळा रचून या तिन्ही आरोपींना अटक केली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्याचे आदेश दिले. या गुन्ह्यातील तत्कालीन तपास अधिकारी धरमसिंग उईके यांनी दोन आरोपींना आधीच अटक केली होती आणि सर्वाविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते. उर्वरित आरोपी अटकेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करीत होते.