एक अशीही अंत्ययात्रा; १०० ड्रोन, डीजे आणि वाहनांचा ताफा!

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
भोजपूर,
funeral procession Bhojpuri बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर परिसरात एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारावेळी अत्यंत अनोखे आणि मोठ्या थाटामाटाचे दृश्य पाहायला मिळाले. सामान्यतः शोकमय वातावरण असणाऱ्या अंत्ययात्रेला येथे मात्र उत्सवासारखे रूप आले होते. विशेष म्हणजे यावेळी प्रसिद्ध बँडसह, शेकडो वाहनांचा ताफा आणि १०० हून अधिक ड्रोन तैनात करण्यात आले होते.
 
 
funeral procession Bhojpuri
 
ही घटना भोजपूर जिल्ह्यातील शाहपूर नगर पंचायत क्षेत्रातील दिलमपूर येथे घडली. शाहपूर ब्लॉकचे रहिवासी कौशल्या पांडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कौशल्या त्यांचा शोक करण्याऐवजी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांची अंत्ययात्रा भव्य स्वरूपात काढण्याचा निर्णय घेतला. या अंत्ययात्रेसाठी मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा, बँड पथक आणि ड्रोनची व्यवस्था करण्यात आली होती. ही अनोखी अंत्ययात्रा चर्चेचा विषय ठरली असून अनेकांनी याला आयुष्याच्या प्रवासाचा सकारात्मक सन्मान म्हणून पाहिले आहे. संपूर्ण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते आणि ही घटना स्थानिक पातळीवर दीर्घकाळ चर्चेत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.