संबंधित शाळा व आठवडी बाजार बंद
वाशीम,
Gram Panchayat by-election राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, २८ एप्रिल रोजी मतदान तर २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र असलेल्या शाळा व संबंधित गावांतील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील एकूण ५१ ग्रामपंचायतींमध्ये ६३ रिक्त पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. वाशीम व मानोरा तालुयातील ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये मंगरूळनाथ तालुयातील चिखलागड, सनगाव, मालेगाव तालुयातील शेलगाव बांदाडे, भौरद,रेगाव/खेर्डी, ब्राम्हणवाडा न.मा, , रिसोड तालुयातील पिंपरखेड/वाडी वाकद ,वडजी, कारंजा तालुयातील मोखड पिंप्री, बेलमंडळ, महागाव, बेलखेड, अंतरखेड, टाकळी खुर्द (जामठी), धोत्रा जहागीर या ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळांमध्ये मतदान केंद्र निश्चित करण्यात आले असून, संबंधित शाळा मतदानाच्या दिवशी पूर्णतः बंद ठेवून त्या केंद्रासाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांना देण्यात आल्या आहेत.
Gram Panchayat by-election तसेच, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी संबंधित गावांतील आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही करून त्याबाबतचा अहवाल प्रशासनास सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी मतदान प्रक्रियेस सहकार्य करावे, असेही प्रशासनाने कळविले आहे.