नागपूर,
Hindi Mor Bhavan विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलनाच्या ‘उभरते सितारे’ उपक्रमांतर्गत ‘आमची पृथ्वी’ या विषयावर हिंदी मोर भवन येथे कार्यक्रम पार पडला.या वेळी विशेष अतिथी म्हणून चित्रपट निर्माते, वितरक तसेच पीपल फॉर अॅनिमल्स संस्थेचे अध्यक्ष मनोज ठक्कर उपस्थित होते. त्यांनी मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये पृथ्वी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करताना झाडे लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि मूक प्राण्यांबद्दल संवेदनशील राहण्याचा संदेश दिला. त्यांचा सन्मान आयोजक युवराज चौधरी यांनी स्वागत वस्त्र व स्मृतीचिन्ह देऊन केला.

कार्यक्रमात मुलांनी ‘आमची पृथ्वी’ या विषयावर Hindi Mor Bhavan आधारित विचार मांडत विविध नृत्य व गाण्यांच्या आकर्षक प्रस्तुती सादर केल्या. यामध्ये श्री बागल यांचे बॉलीवूड, देवांशी पटनायक यांचे ओडिसी, भव्या अरोरा यांचे राजस्थानी घूमर तसेच हिरण्य योगेश चरडे यांचे शास्त्रीय कथक नृत्य विशेष आकर्षण ठरले. प्रगती बावनगडे, तेजस्विनी बावनगडे, अनघा बोरकर, अनीशा लोणारे, भव्या अरोरा, आस्था गुजर, राम बागल आणि आदित मिंज यांनी सादर केलेल्या गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शंभरकर यांनी केले. शेवटी आयोजक युवराज चौधरी यांनी उपस्थित प्रेक्षक, कलाकार व मुलांचे आभार मानले.
सौजन्य:अशोक माटे,संपर्क मित्र