आयएएस डॉ. पंकज पटले यांचा सत्कार

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
IAS Dr. Pankaj Patle केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवा महाराष्ट्र आयएएस कॅडर प्राप्त झालेले डॉ. पंकज पटले यांनी गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदियाचे अध्यक्ष किशोर डोंगरवार आणि सडक अर्जुनीच्या नगर पंचायत उपाध्यक्ष वंदना किशोर डोंगरवार यांच्या सडक अर्जुनी येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा शाल, भेटवस्तू आणि डायरी देऊन सत्कार करण्यात आला.
 
 
IAS Dr. Pankaj Patle
 
IAS Dr. Pankaj Patle डॉ पंकज पटले यांचे वडील मनोहर पटले हे जिल्हा परिषद सेवा निवृत्त शिक्षक आहेत. यावेळी बोलताना डॉ. पंकज पटले यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, शिक्षक यांना दिले. सोबतच सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि स्वतःवरचा विश्वास यामुळे हे यश मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे, मनोगत व्यक्त केले. यावेळी पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, जीवन म्हशाखेत्री, रतन गणवीर, मनोहर पटले, आदित्य डोंगरवार उपस्थित होते. प्रसंगी किशोर डोंगरवार यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मुले केंद्रीय लोकसेवा आयोग असो की राज्यसेवा आयोग या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत आहेत, जिल्हा परिषद शिक्षकाच्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र कॅडर भेटून जिल्ह्याचा नावलौकिक केला आहे. हे आमच्या प्राथमिक शिक्षकांसाठी गौरवास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे. यामुळे पुढे जिल्ह्यातील मुले प्रेरणा घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली.