रिसोड,
Intra - tractor accident दुधाच्या कॅन घेऊन येत असलेल्या चार चाकी वाहनाने ट्रॅटरला मागून धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता रिसोड सेनगाव मार्गावर मुंगसाजी नगर जवळ घडली. अपघात एवढा भीषण होता की मृतकास काढण्यासाठी एक ते दीड तास लागला. यासाठी स्थानिक नागरिकांनी मदत केली. घटनेनंतर अज्ञात ट्रॅटर घटनास्थळावरून पसार झाला आहे.
Intra - tractor accident वैजनाथ भाऊराव मुकाडे वय २४ रा.खिलार तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली असे मृतकाचे नाव असून, वाहन चालक दतराव चिलधर वय २६ राहणार खिलार ता. सेनगाव जि. हिंगोली असे जखमीचे नाव आहे. जखमीस प्रथम रिसोड येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले तर पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठवण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुयातील खिलार येथील दतराव चिलधर हे आपल्या एका अन्य साथीदार वैजनाथ भाऊराव मुकाडे याच्यासह आपले इंट्रा वाहन क्रमांक एमएच ३८ एस ३८९० ने सेनगाव कडून रिसोड कडे दुधाच्या कॅन घेऊन येत असताना रात्री ११ वाजता च्या दरम्यान समोर चालत असलेल्या एका अज्ञात ट्रॅटरला जबर धडक दिली. या धडकेत कंडटर साईड चा वाहनाचा अक्षरचा चुराडा झाला. यामध्ये वैजनाथ मुकाडे याचा जागीच मृत्यू झाला तर दतराव चिलधर हे गंभीरित्या जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गीते हे घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीस रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले व तसेच मृतकास एक ते दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी दाखल केले. २५ एप्रिल रोजी सकाळी मृतकावर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह परिवारा चे सुपूर्द करण्यात आला. सदर घटनेस कारणीभूत ट्रॅटरचा रिसोड पोलिस शोध घेत आहे. पुढील तपास रिसोड पोलिस करत आहे.