शिष्यवृती परीक्षेत जेसी हायस्कूलचे १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड, 
JC High School in the scholarship exam शैक्षाणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत जे. सी. हायस्कूलमधील १४ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. आर्थिकदृष्टया मागास विद्यार्थ्यां मधुन प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना करण्याच्या हेतूने सन २००७- ०८ पासून केंद्रसरकार मार्फत या परीक्षेचे दरवर्षी आयोजन केल्या जाते. या परीक्षेत ओबीसी प्रवर्गातून १०, एनटीसी प्रवर्गातून १, एससी प्रवर्गातून १, एसबीसी प्रवर्गातून १ तर इएस डब्ल्यू प्रवर्गातून १ अशा एकूण १४ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात आली आहे.
 
 
jc
 
JC High School in the scholarship exam  वर्ग ८ मधील अनुष्का वानखडे, स्वरा इंदाणे, जितेंद्र शिंदे, स्नेहल दिघडे, नैतिक तालन, स्वरा साखरकर, नारायणी गावंडे, अनुष्का अंधारे, उन्नती राऊत, शांभवी विभूते, आर्या ठाकरे, परिणीती सोनोने, स्वराली भड व गार्गी देशमुख या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान कायम ठेवले आहेत. या परीक्षेसाठी विद्यालयातील शिक्षक भारत हरसुले, प्रशांत गंधक, विद्या पवार, प्रकाश थेर, अश्विनी तायडे, दिनेश पळसकर व स्वप्निल शहाकार यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे दरवर्षी शाळेमध्ये एन. एम. एम. एस. चे वर्ग मी निःशुल्क घेतले जातात. कारंजा एज्युकेशन सोसायटीचे सचिव अमलप्रभ चवरे, जे. सी. हायस्कूलचे प्राचार्य भारत हरसुले, पर्यवेक्षक प्रशांत गंधक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.