- राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती
नागपूर,
Kabaddi tournament नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या ३० एप्रिल ते ४ मे दरम्यान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या ‘जय’ नामक अधिकृत मस्कॉटचे लोकार्पण कोराडी क्रीडा संकुल येथे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जिल्हा नागपूर, अमरावती चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी महादुला नगरपंचायतच्या नगराध्यक्षा हेमलता सावजी, उपाध्यक्षा वैशाली पखिड्डे, येरखेडा नगरपंचायतचे नगराध्यक्ष बर्वे, भाजप कोराडी मंडळ अध्यक्ष ब्रम्हा काळे, महादुला नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष राजेश रंगारी, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष अंबुलकर, क्रीडा अधिकारी अनिल बोरावार, स्वप्निल बनसोड, क्रीडा मार्गदर्शक निशांत पाटील, कामठी पंचायत समिती माजी सभापती उमेश रडके, माजी सरपंच नरेंद्र धानोले, रामबाबू तोडवाल, भाजपा कोराडी लुकेश वर्होकर यांच्यासह अन्य मान्यवर, नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
Kabaddi tournament याप्रसंगी बोलताना राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, जिल्ह्यातील तसेच विदर्भातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी जिल्ह्यात उभारण्यात येणार्या क्रीडा सुविधांबद्दल देखील माहिती दिली. शहरात खेळांचे वातावरण निर्माण व्हावे आणि खेळाडूंना मिळाव्या यासाठी आधुनिक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक गेम्स खेळता येईल, असे क्रीडा संकुल मानकापूर परिसरात उभारण्यात येणार्या साडे सातशे कोटींची तरतूद येथील आधुनिक स्टेडियमच्या उभारणीसाठी करण्यात आले आहे. हे संपूर्ण विदर्भाचे क्रीडा संकुल असणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.