मुंबई
Kapuskonda Marathi movie ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले हे दिग्गज कलाकार तब्बल २२ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी ‘नवरा माझा नवसाचा’ या गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने मधुराणी गोखले मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.
या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. पटकथा आणि संवादलेखनात गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांचा सहभाग आहे. छायांकनाची जबाबदारी सचिन पाटेकर यांनी सांभाळली असून, संगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिले आहे. गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी सजली आहेत.
या चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले यांच्यासोबत नव्या पिढीतील कलाकार—अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि भूषण पाटील—यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे.
‘कापूसकोंडा’ची कथा Kapuskonda Marathi movie अत्यंत वेगळी आणि हळवी आहे. एका सत्य घटनेवर प्रेरित असलेली ही गोष्ट एका कुटुंबाभोवती आणि त्यांच्या आयुष्यातील एका कुत्र्याभोवती फिरते. मानवी नातेसंबंध, कुटुंबातील भावना आणि माणूस व प्राणी यांच्यातील नातं यांचा सुंदर संगम या कथेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच या चित्रपटाला ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.चित्रपटाबद्दल बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी यापूर्वी कधीही अशा प्रकारची कथा केली नव्हती. कथानकाने त्यांना भावनिकदृष्ट्या जोडले आणि दिग्दर्शकावर विश्वास ठेऊन त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिला. तर मधुराणी गोखले यांनी सांगितले की, कथा ऐकताच त्या तिच्या प्रेमात पडल्या आणि वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांनी हा प्रकल्प स्वीकारला.अनोख्या विषयामुळे आणि ‘कापूसकोंडा’ या श्वानाच्या भूमिकेमुळे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण करत आहे.