जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालत

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
यवतमाळ,
'Lok Adalat' राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशांनुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यवतमाळचे शेखर मुनघाटे यांच्या मार्गदर्शनात 9 मे रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ व जिल्हा वकील संघ, यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालय, यवतमाळ येथे तसेच यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालये, कामगार न्यायालय व औद्योगिक न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, ग्राहक तकार निवारण मंच आणि इतर सर्व न्यायालये नसेन न्यायाधिकरणे येथे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असलेले तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, भुअर्जन मागल्याची प्रकरणे, महसुली प्रकरणे, वैवाहिक संबंधातील बाद प्रकरणे, बँका व अन्य वित्तीय संस्थांचे नुकसान व वसुली प्रकरणे व तडजोडीस पात्र असणारी सर्व प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली निघणार आहे.

court hemar
'Lok Adalat' लोकअदालतीमध्ये वाद मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजीक कार्यकते याचे मंडळ पक्षकारांस मदत करेल. तसेच लोकअदालतीमध्ये प्रकरण ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. लोकअदालतीच्या निवाड्याविरूध्द अपील नसल्याने वाद कायमचा मिटतो. न्यायालयाच्या हकुमनाम्याप्रमाणे लोकअदालतीमध्ये होणाèया निवाड्याची अंमलबजावणी न्यायालयामार्फत करता येते. खटल्यांमध्ये साक्षी पुरावा, उलट तपासणी, दिर्घ युक्तीवाद टाळल्या जातात. प्रकरण न्यायालयात बोलावण्यासाठी होणाèया त्रासातून सुटका होते व त्वरीत आपसी संमतीने न्याय मिळतो. संबंधित पक्षकारांनी आपली प्रकरणे 9 मे रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ठेवण्याकरीता प्रलंबित प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात अर्ज सादर करावा. दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ईनर तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयाशी संपर्क साधून आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून आपसी तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन शेखर मुनघाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव दीपक दाभाडे व जिल्हा वकील संघ अध्यक्ष संजय जैन यांनी केले आहे.