आर्णी,
बहुभाषिक ब्राह्मण एकत्र येऊन Lord Parashuram Jayanti भगवान परशुराम जयंती येथील विठ्ठल मंदिरात साजरी केली. आर्णीतील ब्राह्मण समाजातर्फे आयोजित कार्यक्रमात उमरखेड येथील अजय पांडे हे प्रमुख वक्ते होते. त्यांनी त्यांच्या भाषणात आर्णी ब्राह्मण समितीचे बहुभाषिक ब्राह्मण एकत्रित करून भगवान परशुराम जयंती साजरी करण्याच्या निर्णयाचे अभिनंदन केले.
त्यांनी Lord Parashuram Jayanti भगवान परशुरामाच्या जीवनावर प्रकाश टाकून ब्राह्मण समाजाची आजची स्थिती आणि भविष्यकाळ यावरही भाष्य केले. कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक विनायक थोडगे यांनी आर्णीत आयोजित शिवमहापुराण सप्ताहात कार्यकारी अध्यक्ष म्हणून योगदान दिल्याबद्दल समाजातर्फे त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गौरी जयशंकर दीक्षित हिची पोलिस प्रशासनात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. मिलिंद पांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी आर्णीतील सर्व बहुभाषिक ब्राह्मणांनी सहकार्य केले. यात प्रमुख्याने गोपाल शर्मा, गजानन तायडे, आदित्य कोंडोलीकर, शरद वèहाडपांडे, नवनीत दाभाडकर, इंदोरिया, प्रीतम जोशी, थोडगे, राजू देशपांडे याचां समावेश आहे.