काँग्रेस पवन खेडांच्या पाठीशी

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली
Pawan Khera काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा अटकपूर्व जामिनासाठी देशभरातील न्यायालयांमध्ये भटकत असले तरी, त्यांचा पक्ष काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाने शुक्रवारी खेडा यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी शनिवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. काँग्रेस पवन खेडा यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
 

Pawan Khera anticipatory bail case 
काँग्रेस सरचिटणीस जयराम पुढे म्हणाले, खेडा यांच्या बचावासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करीत आहोत. खेडा यांना न्याय मिळवून देण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास काँग्रेसला आहे. संपूर्ण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, पक्षाचे माध्यम आणि प्रसिद्धी विभागांचे अध्यक्ष हे पवन खेडा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
दबावाच्या राजकारणात न्याय मिळेल
काँग्रेस सरचिटणीस जयराम पुढे म्हणाले, सत्ताधाèयांकडून विरोधकांना धमकावने, दबाव टाकणे, भीती निर्माण करणे आणि छळणे, असा सुडबुद्धीच्या राजकारणात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल, असा आमचा विश्वास आहे.
काँग्रेस नेते पवन Pawan Khera  खेडा यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नी रिंकी भुनिया सरमा यांच्याकडे तीन विदेश पासपोर्ट आणि विदेशात मालमत्ता असल्याचा आरोप केला होता. या आरोपांविरोधात रिंकी भुनिया यांनी गुवाहाटी क्राईम ब्रांच पोलिस ठाण्यात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. याप्रकरणी खेडांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी खेडा विविध न्यायालयात याचिका दाखल करत आहे. मात्र, अद्याप कोणत्याही न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळालेला नाही.