लुधियाना (पंजाब)
Punjab cyber fraud व्यावसायिक आणि उद्योगपती जगदीप सिंग यांची क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली अंदाजे 20 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झाली आहे. मोहाली सायबर पोलीस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत नोंदवलेल्या सर्वात मोठ्या सायबर फसवणुकींपैकी ही एक मानली जात आहे. सायबर गुन्हेगारांनी फेसबुकद्वारे त्यांच्याशी संपर्क साधून ही फसवणूक केली.
सायबर पोलिसांनी बीएनएसटीच्या कलम 318 (4), 336 (3), 61 (2) आणि 66 (डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जरी एफआयआर 2026 मध्ये दाखल करण्यात आला असला तरी, त्यात 15 मे 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 या कालावधीचा उल्लेख आहे. हा गुन्हा 17 एप्रिल 2026 रोजी मोहाली सायबर सेल पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आला. तक्रारदार जगदीप सिंघल आहेत.एफआयआरमध्ये सविस्तरपणे सांगितले आहे की, फेसबुकवर प्रथम मैत्री करून नंतर त्यांची फसवणूक कशी करण्यात आली. ही फसवणूक गुंतवणुकीच्या नावाखाली करण्यात आली. गुंतवणुकीच्या नावाखाली जगदीप सिंग यांची विविध बँक खात्यांमधून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आणि त्यानंतर घोटाळा करण्यात आला. याची सुरुवात मे 2025 मध्ये 1 लाख रुपयांपासून झाली, परंतु गुंतवणूक हळूहळू कोट्यवधी रुपयांपर्यंत वाढत गेली.एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, सायबर फसवणुकीसाठी एका वेबसाइटचा वापर करण्यात आला, जी अनेक पटींनी नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत होती. सुमारे 15 बँकांमध्ये तयार केलेल्या अंदाजे 76 खात्यांचा आणि बनावट सिम कार्डांचा वापर करून ही संपूर्ण रक्कम काढून घेण्यात आली.
मूळ ट्रेडिंग Punjab cyber fraud वेबसाइटसारखीच एक वेबसाइट तयार करून ही फसवणूक करण्यात आली.एफआयआरनुसार, उद्योगपती जगदीप सिंघल यांची एकूण 19 कोटी 84 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक झाली असून, ही रक्कम 15 मे ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान 15 वेगवेगळ्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. असेही वृत्त आहे की, 17 ते 20 नोव्हेंबर 2025 या केवळ चार दिवसांत पीडित व्यक्तीकडून या खात्यांमध्ये 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त (अंदाजे 1.5 दशलक्ष डॉलर्स) रक्कम हस्तांतरित करण्यात आली. सायबर गुन्हेगारांनी दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि बंगळूरु येथे पसरलेल्या खात्यांच्या नेटवर्कचा वापर केला.तक्रारीनुसार, पीडित व्यक्तीने प्रथम फेसबुकवर अनामिका राय नावाच्या व्यक्तीशी मैत्री केली, त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅट्सद्वारे विश्वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांना गुंतवणुकीच्या संधींबद्दल माहिती देण्यात आली. पहिली गुंतवणूक केल्यावर 4.3 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त नफा दाखवण्यात आला आणि जसजशी गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढत गेली, तसतशी कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाली. ही रक्कम केवळ खाजगी बँक खात्यांमध्येच नव्हे, तर काही सरकारी बँकांच्या खात्यांमध्येही जमा करण्यात आली होती.अधिकाèयांच्या माहितीनुसार, मोहाली सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत