राज कुंद्रा यांचा अध्यात्माकडे कल

शिल्पा शेट्टीची प्रतिक्रिया चर्चेत

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
मुंबई

Raj Kundra बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून दूर असली, तरी ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. यावेळी ती स्वतःमुळे नव्हे, तर पती राज कुंद्रा यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. राज कुंद्रा यांनी अलीकडेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि अध्यात्माकडे वळण्याबद्दल खुलासा केला असून, त्यावर शिल्पाची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
 

Raj Kundra spirituality, Shilpa Shetty reaction 
अलीकडेच राज कुंद्रा यांना पांढऱ्या पगडीमध्ये पाहण्यात आले. त्यामुळे ते शीख धर्माचे पालन करत असल्याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या या निर्णयाबद्दल शिल्पा शेट्टी आनंदी आहे. शिल्पा सर्व धर्मांचा आदर करते आणि विविध परंपरा जपते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज कुंद्रा यांनी आपल्या Raj Kundra  भूतकाळाबद्दल सांगताना एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले की, एक काळ असा होता की त्यांना देवावर अजिबात विश्वास नव्हता. ते स्वतःला जवळजवळ नास्तिक मानत होते आणि आयुष्य पूर्णपणे कर्मांवर आधारित असल्याचे त्यांचे मत होते. मात्र, कालांतराने ते अध्यात्माकडे वळले आणि शीख धर्माच्या शिकवणींनी त्यांना प्रभावित केले. या बदलानंतर शिल्पाने हलक्या-फुलक्या अंदाजात “माझा नवरा आता लाईनवर आलाय” अशी प्रतिक्रिया दिल्याचेही त्यांनी सांगितले.राज यांनी पुढे सांगितले की, ते हिंदू परंपराही पाळतात, परंतु शीख धर्माने त्यांना एक वेगळा आत्मिक आधार आणि आपलेपणाची भावना दिली आहे. याच भावनेमुळे ते आज जिथे आहेत, तिथपर्यंत पोहोचू शकले, असे त्यांनी नमूद केले.दरम्यान, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही नेहमीच उत्सुकता असते. दोघांनी सुमारे दोन वर्षांच्या नात्यानंतर २२ नोव्हेंबर २००९ रोजी विवाह केला. विशेष म्हणजे, शिल्पासोबतचा हा राज यांचा दुसरा विवाह आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता असून, त्यांना एक मुलगी आहे. मात्र, ते नाते टिकू शकले नाही आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.