अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी आंदोलनात आ. अग्रवालांचीही एंट्री

    दिनांक :25-Apr-2026
Total Views |
गोंदिया, 
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माजीमंत्री व विद्यमान आमदार Rajkumar Badole राजकुमार बडोले यांनी आयोजित केलेल्या अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधातील आंदोलनात गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही उपस्थिती लावून आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी जाहीर सभेत अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात उतरलेल्या हजारो समाजबंधूंना मार्गदर्शन करताना आ. अग्रवाल म्हणाले की, आपण जनता आहोत, त्यांचा आवाज आहोत.
 
 
agrawal
 
Rajkumar Badole  जनतेवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात उभे राहून त्यांना न्याय मिळवून देणे हे आपले कर्तव्य आहे, आपण सर्व मिळून हे आंदोलन पुढे नेण्याचे काम करू. आरक्षणाचा मुद्दा आणि त्यासंबंधित अनेक प्रश्न देशभरात मोठ्या स्तरावर सुरू आहेत. अशा काळात पुन्हा एक नवा गंभीर मुद्दा आपल्या समोर उभा राहिला आहे. अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करताना राज्य सरकारने बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयातील सर्व बाबींचे पालन व्हायलाच हवे. सध्या जातिनिहाय जनगणना होणार आहे. जोपर्यंत जनगणनेचा निकाल येत नाही, तोपर्यंत उपवर्गीकरणाची घाई का? आपल्या मूळ आरक्षणाला धक्का लागता कामा नये. खरंच याची आवश्यकता आहे का? समाज याबाबत काय विचार करतो? यावर गंभीर विचार होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
 
 
पुढे बोलताना आ. अग्रवाल म्हणाले की, राज्यात खासदार, आमदार, जनप्रतिनिधी आहेत. या उपवर्गीकरणाच्या विरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आगामी काळात या लढाईत आपण सर्व सोबत आहोत. गरज पडल्यास रस्त्यावर उतरूनही लढू. विधानसभेत हा मुद्दा गांभीर्याने मांडून सरकारला मागण्या मान्य करण्यास भाग पाडू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.