नागपूर,
Sakhi Sobati Foundation स्व. डॉ. श्याम छाडी आणि स्व. डॉ. किशोर चरडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सखी सोबती फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उन्हाळ्यात नागपुरातील रक्तपेढ्यांमध्ये निर्माण होणारा तुटवडा लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हे शिबिर रविवार, 26 एप्रिल रोजी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत उत्तर अंबाझरी रोडवरील IMA हॉल, रामदासपेठ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.Sakhi Sobati Foundation यावेळी रक्त संक्रमण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी हे सायंकाळी 6 वाजता “रक्तांचे रंगी” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सखी सोबती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
सौजन्य : देवराव प्रधान,संपर्क मित्र